Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलैला पुणे-बारामती सायकल स्पर्धा

दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलैला पुणे-बारामती सायकल स्पर्धा

MahaeNews 2 weeks ago

पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन २२ जुलै रोजी करण्यात आले आहे.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे ४५० सायकलपटू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सायकलपटूंनी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे व मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले आहे.

स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पुणे ते बारामती ही १२२ किलोमीटरची पुरुषांसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा, सासवड ते बारामती ही ८५ किलोमीटरची पुरुषांसाठी खुली राज्यस्तरीय एमटीबी स्पर्धा आणि महिलांसाठी माळेगाव ते बारामती ही १५ किलोमीटरची राष्ट्रीय स्पर्धा यांचा समावेश आहे.

प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच दिवे घाट सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला राज्य व राष्ट्रीय स्तरावर 'घाटाचा राजा' हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसून इच्छुक स्पर्धकांनी क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे (७९७२१८९६७०) व डॉ. योगेश पवार (९८५०९५२७८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. कदम यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews