Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गेटवे ऑफ इंडियावर मार्को रुबियो यांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत

गेटवे ऑफ इंडियावर मार्को रुबियो यांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत

MahaeNews 5 hrs ago

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला.

तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची, सांस्कृतिक परंपरेची आणि शहराच्या वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना करून देण्यात आली.

वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकी शिष्टमंडळ उपस्थित

या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते. तसेच, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यही यावेळी उपस्थित होते.

मुंबईच्या ऐतिहासिक स्थळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्वागतामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि ऐतिहासिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews