Dailyhunt
IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

MahaeNews 1 week ago

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सलग दुसरा सामना जिंकला. पंजाबने गुजरात टायटन्सनंतर शुक्रवारी 3 एप्रिलला यजमान चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं.

पंजाबने या विजयासह धमाका केला. पंजाबने चेन्नईला पराभूत करुन राजस्थान रॉयल्सलाही झटका दिला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबमुळे राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच याचा परिणाम इतर संघांवरही झालेला पाहायला मिळाला. एका बाजूला पंजाब पहिल्या स्थानी पोहचली. तर चेन्नई सलग दुसऱ्या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी 10 व्या स्थानी घसरली आहे.

पंजाबने याआधी या मोहिमेतील आपला पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता. पंजाबने या सामन्यात गुजरातवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर आता पंजाबने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय साकारला. पंजाबने चेन्नईकडून मिळालेलं 210 धावांचं आव्हान 8 बॉलआधी पूर्ण केलं. पंजाबच्या खात्यात 2 विजयासह एकूण 4 गुण झाले आहेत. तर पंजाबचा नेट रनरेट हा 0.673 इतका झाला आहे. तर चेन्नईचा सलग दुसऱ्या पराभवानंतर नेट रनरेट हा -2.562 असा झाला आहे.

चेन्नई विरुद्ध पंजाब हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील सातवा सामना होता. या सामन्याच्या निकालानंतर इतर संघांवरही परिणाम झालाय. राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. या सामन्याआधी मुंबई चौथ्या स्थानी होती. मुंबई पंजाबच्या विजयानंतर पाचव्या तर दिल्ली चौथ्या स्थानी पोहचली आहे. राजस्थान,आरसीबी, दिल्ली आणि मुंबई हे 4 संघ अजिंक्य आहेत. या 4 संघाच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण आहेत.

तर 4 संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. या 4 संघांमध्ये चेन्नई व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा समावेश आहे.

दरम्यान शनिवारी 4 एप्रिलला 19 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून पंजाबला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकण्याची संधी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews