Monday, 14 Jun, 3.38 pm MahaeNews

होम
जागतिक रक्तदान दिन; तुषार हिंगे आयोजित शिबिरात 130 जणांनी केले रक्तदान

पिंपरी |महाईन्यूज|

रक्त हा शरीराचा अविभाज्य घटक आहे. संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व ऑक्सिजन देण्याचे काम रक्तद्वारे होते. रक्तदान केल्याने गरीब व गरजूंचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी रक्तदान शिबिर घेण्याची गरज आहे, असे मत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी (दि.13) व्यक्त केले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे संभाजीनगर, चिंचवड येथे घेण्यात आले. त्यात तब्बल 130 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होते. आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका अनुराधा गोरखे, आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली हिंगे, राजू दुर्गे, मधुकर बाबर, रौद्र शंभो प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संदीप थोरात, श्रीकांत देसाई, संभाजी बालघरे, विक्रम जानूगडे, अमित देशमुख या वेळी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या की, पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव व रुग्णांना मोठया प्रमाणावर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता असे सामाजिक उपक्रम झाले पाहिजेत. रक्तदान हे एक सामाजिक कर्तव्य आहे. ते आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी समजून पार पाडायला पाहिजे. आजच्या कोरोना संक्रमणाच्या काळात येवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांकडून यशस्वी पध्दतीने रक्तदान करवून घेण्यासाठी नगरसेवक तुषार हिंगे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

शिबिरात एकुण 130 जणांनी रक्तदान केले. माजी उपमहापौर, नगरसेवक तुषार हिंगे यांच्या नेतृत्वाखाली आरंभ सोशल फाउंडेशन, रौद्र शंभो प्रतिष्ठाण, संघर्ष मित्र मंडळ आणि सह्याद्री प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले. जितेंद्र छाबडा यांनी सुत्रसंचालन केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews
Top