Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'कान्स'च्या समारोपाच्या दिवशी ऐश्वर्या रायचा जलवा!

'कान्स'च्या समारोपाच्या दिवशी ऐश्वर्या रायचा जलवा!

MahaeNews 17 hrs ago

Aishwarya Rai Cannes 2026 | यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) हा नवनवीन लूक, हटके स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चांगलाच रंगला. या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिची.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच ऐश्वर्या कधी हजेरी लावणार, याकडे तिच्या जगभरातील चाहत्यांचे डोळे लागले होते. अखेर कान्स फेस्टिव्हलच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये हजेरी लावत ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे रेड कार्पेट गाजवले. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी तिने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या एलिगंट ड्रेसमधील मनमोहक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ऐश्वर्या राय बच्चन ही गेली दोन दशकांहून अधिक काळ कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. २००३ पासून ती 'L'Oréal पॅरिस' या नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँडची ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून येथे झळकत आहे. यंदाच्या वषी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आधीच रेड कार्पेटवर आल्यामुळे, सोशल मीडियावर ऐश्वर्याला यंदा डावलण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासह कान्ससाठी रवाना झाली आणि शेवटच्या दोन्ही दिवशी तिने रेड कार्पेटवर आपल्या खास लूकने चाहत्यांना भुरळ पाडली.

'कान्स महोत्सव समारोप सोहळ्यासाठी ऐश्वर्या रायने डिझायनर चेनी चान कूचर यांनी डिझाइन केलेला कस्टमाईज व्हाईट सूट परिधान केला होता. त्यावर सिल्व्हर डिझाइन असलेले फर आणि फेदर केप स्टाईल केले होते. या केपने ऐश्वर्याच्या लूकला अधिक रेड कार्पेट टच दिला होता. फॉर्मल जॅकेट आणि त्याला असणारी सिल्व्हर डिटेलिंग एलिगंट लूक देत होती. त्यासह फॉर्मल पँटवरदेखील अशाप्रकारे सिल्व्हर वर्क करण्यात आले होते. स्मोकी आय आणि डीपनेक असलेल्या या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य अधिक खुलले होते. मोकळ्या केसांसह आणि ग्लॅमरस मेकअपने ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर प्रभावी आणि आकर्षक दिसत होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews