Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या देणार राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार?

कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या देणार राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार?

MahaeNews 1 week ago

Karnataka CM | कर्नाटकच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण 'ब्रेकफास्ट मीटिंग'मध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा धक्कादायक निर्णय जाहीर केला.

या वेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील त्यांच्या शेजारी उपस्थित होते. सिद्धरामय्या आज दुपारी ३ वाजता आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांसमक्ष आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचे स्पष्ट केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या वैयक्तिक कारणास्तव राज्याबाहेर असले, तरीही आपण आपला राजीनामा त्यांच्याकडे पाठवून देणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. या घडामोडींनंतर आता कर्नाटकमध्ये नवीन मुख्यमंत्री आणि विधीमंडळ गटनेता निवडण्यासाठी लवकरच 'काँग्रेस विधिमंडळ पक्षाची' (CLP) बैठक बोलावली जाणार आहे.

'मेलो तर मेलो, पण उपोषण करणारच'; मनोज जरांगे पाटलांचा आरपारचा इशारा

सिद्धरामय्या यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. २०२३ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मोठी रस्सीखेच सुरू होती. दिल्लीतील हायकमांडने अनेकदा मध्यस्थी करूनही हा वाद पूर्णपणे निवळला नव्हता. मात्र, अखेर आज सिद्धरामय्या यांनी माघार घेतल्याने डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हा राजीनामा सहजासहजी झालेला नाही, तर यामागे दिल्लीतील 'हायकमांड'ची मोठी रणनीती असल्याचे समजते. गेल्या ४८ तासांत दिल्लीत अत्यंत गोपनीय बैठका आणि खलबतं झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून एक मोठी 'ऑफर' देण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांना केंद्रात म्हणजेच राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे सुपुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांना कर्नाटक मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले जाणार आहे. या मोठ्या राजकीय तडजोडीनंतरच सिद्धरामय्या राजीनामा देण्यास तयार झाल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आता कर्नाटकच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews