Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे

लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे

MahaeNews 4 months ago

Health : आजकाल बहुतेक पालकांना चिंता वाटते की त्यांची मुलं पुरेसं अन्नाचे सेवन करत नाही किंवा‍ त्यांना भूक लागत नाही. तर याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणारे चिप्स आणि इतर पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचे सततचे सेवन.

अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अशा पदार्थांमध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हमुळे मुलांना हे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत मुलांना शरीरात भूक न लागण्याची व घरातील जेवण न खाण्याची समस्या देखील निर्माण होऊ लागते. अशातच आपल्या मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालावे याकरिता प्रत्येक पालकांची खूप धावपळ होते. तर काही घरांमध्ये काही मुलं अशी असतात जे अन्नाचा एकही कण खात नाही. कारण अशी अनेक मुलं आहेत जी 3 वर्षे फक्त दूधच पितात. याकरिता मुलांनी घरातील पौष्टिक आहार घ्यावा यासाठी पालक वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात.

मुलांमध्ये हे वर्तन सामान्य आहे, परंतु ही समस्या अशीच राहिल्यास अनेकदा वजन कमी राहते. आजकाल लोक मुलांना मल्टीव्हिटॅमिन सिरप देतात, पण पोषक तत्वांचा सर्वोत्तम स्रोत अन्न आहे. तर या लेखात आपण मुलाची भूक वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

मुलांची भूक वाढवण्याबद्दल आयुर्वेद काय सांगते?

भूक वाढवण्यासाठी पचनसंस्थेची नैसर्गिकरित्या काळजी घेण्याचा सल्ला आयुर्वेद देत असते. आयुर्वेदिक औषधी वनस्पती, घरगुती उपाय आणि पारंपरिक औषधे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांची भूक वाढवू शकतात. या आयुर्वेदिक पद्धती पचनक्रिया सुधारतात आणि नैसर्गिकरित्या आपली भूक वाढवण्याचे काम करतात.

आयुर्वेदिक उपाय

बडीशेपचे पाणी - ही छोटीशी बडीशेप पोटासाठी एक वरदान आहे. बडीशेपही पचनसंस्थेसाठी उत्कृष्ट मानली जाते. तिच्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मामुळे उन्हाळ्यात तिचे सेवन करणे सर्वोत्तम ठरते. लहान मुले ती थेट खाऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना बडीशेपचे पाणी प्यायला द्यावे. दररोज दोन चमचे बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोट फुगणे आणि पचनाच्या इतर समस्या टाळण्यास मदत होते. निरोगी पोटामुळे भूकही वाढते.

आल्याचा उपाय - आयुर्वेद तज्ञांच्या मते भूक वाढवण्यासाठी आलं आणि सैंधव मीठाचा उपाय देखील प्रभावी आहे. आपल्या मुलाला जेवण देण्याआधी सैंधव मीठासोबत आल्याचा एक तुकडा त्याच्या तोंडात ठेवा. तो तुकडा थोडा वेळ तोंडात ठेवा आणि नंतर काढून टाका. यामुळे लाळ निर्माण होईल, जी पोटातील एन्झाइम्सना सक्रिय करेल.

लवंग आणि मध - तज्ज्ञांच्या मते भूक वाढवण्यासाठी लवंग आणि मधाचा उपाय प्राचीन काळापासून वापरला जात आहे. लवंगामध्ये असे अनेक घटक असतात जे पोटाचे आरोग्य सुधारतात. सर्वप्रथम, लवंगा भाजून त्याची पूड बनवा. या पूडचा थोडासा भाग अर्धा चमचा मधात मिसळून आपल्या मुलाला खाऊ घाला. यामुळे केवळ पोटाचे आरोग्यच सुधारणार नाही, तर सर्दी आणि खोकला टाळण्यासही मदत होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews