Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

MahaeNews 3 days ago

पुणे | राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली असता आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून गृहभेटींचा कालावधी ३० जून ते १७ ऑगस्ट असा राहणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे कामही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, त्यावरील सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६' माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मतदार याद्यांमधील काही मतदारांच्या पत्त्यांची माहिती अपुरी किंवा संक्षिप्त स्वरूपात नोंदविण्यात आलेली होती.उदाहरणार्थ, एखाद्या मतदाराचा पत्ता केवळ 'अमुक व्यक्ती, कोथरूड, पुणे' एवढाच नमूद असल्यास संबंधित मतदाराचा शोध घेणे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी (बीएलओ) वेळखाऊ आणि आव्हानात्मक ठरते. त्यामुळे अशा मतदारांनी स्वतःहून आपल्या क्षेत्रातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधल्यास नोंदणी अर्ज (Enumeration Form) वाटप व पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करता येईल. संबंधित माहिती pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews