Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवड भाजपाचे आता 'सेवा संकल्प अभियान'

पिंपरी-चिंचवड भाजपाचे आता 'सेवा संकल्प अभियान'

MahaeNews 10 hrs ago

- दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान जनसेवा, सामाजिक व युवा-केंद्रित उपक्रमांची मालिका

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित 'सेवा संकल्प अभियान'ाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड जिल्हास्तरीय कार्यशाळा पिंपळे सौदागर येथील बासुरी बॅंक्वेट हॉल, हॉटेल गोविंद गार्डन येथे उत्साहात पार पडली.

भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा सविस्तर आराखडा कार्यशाळेत जाहीर करण्यात आला. शहरातील प्रत्येक भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याचा संकल्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अभियानाच्या नियोजनावर विशेष भर देत, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने नागरिकांशी थेट संवाद साधून शासकीय योजना, सेवाभावी उपक्रम व विकासकामांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन केले. सेवा हीच भाजपची कार्यपद्धती असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचणे, हाच अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियानांतर्गत 'आशिर्वादाचा दिवा', 'स्वप्नाचा भारत' चित्रकला व भाषण स्पर्धा, 'नमो सेवा गाथा' नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांवरील रील स्पर्धा, इनोव्हेशन चॅलेंज, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, सेवा दीप यात्रा आणि जनसेवेचा महाकुंभ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 'सेवा हेच आमचे संघटन आणि सेवा हाच आमचा ध्यास आहे. सेवा संकल्प अभियान केवळ कार्यक्रमांची मालिका नसून, पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाशी जोडले जाण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याचा दृढ संकल्प आहे,' असे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्पष्ट केले.

'सेवा हेच भारतीय जनता पार्टीचे खरे बळ आहे. 'सेवा संकल्प अभियान'ाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि समाजातील वंचित घटकांसाठी प्रत्यक्ष सेवाभावी उपक्रम राबविणे, हा आमचा संकल्प आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून हे अभियान जनतेचे अभियान बनवावे.'

— शत्रुघ्न (बापू) काटे
शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews