Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

MahaeNews 16 hrs ago

पिंपरी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय व पारंपरिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, हरिपाठ तसेच वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीचे आकर्षक सादरीकरण केले. या प्रसंगी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. भक्ती, संस्कार, एकात्मता आणि भारतीय परंपरेचे जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. शाळेच्या व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होत असल्याचे सांगितले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

'॥ पंढरीच्या विठ्ठलाची, जय जय राम कृष्ण हरी ॥'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews