Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे डॉक्टर दिनानिमित्त दंत आरोग्य जनजागृती सत्र संपन्न

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे डॉक्टर दिनानिमित्त दंत आरोग्य जनजागृती सत्र संपन्न

MahaeNews 1 week ago

पिंपरी | डॉक्टर दिनाचे औचित्य साधून प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या प्री-स्कूल विभागातील विद्यार्थ्यांसाठी दंत आरोग्य जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. हे मार्गदर्शन सत्र डॉ. शाहीन व्ही.

वळसंगकर (BDS) यांनी अतिशय सोप्या व आकर्षक पद्धतीने घेतले.

डॉ. वळसंगकर यांनी विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व, योग्य पद्धतीने दात घासण्याची पद्धत तसेच दात निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या आहाराच्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी दैनंदिन जीवनात चांगल्या दंत स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले.

विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले आणि आनंदाने उपक्रमात सहभागी झाले. लहान वयापासूनच दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरले.

या प्रसंगी प्रियदर्शनी स्कूलतर्फे डॉ. शाहीन व्ही. वळसंगकर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. डॉक्टर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews