Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

MahaeNews 2 weeks ago

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर आधारित मनोगते, कविता, भक्तिगीते तसेच सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, शिस्त, ज्ञान आणि चारित्र्य यांचे मूल्य समजावून सांगितले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव अधिक दृढ झाली. संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. शाळेच्या व्यवस्थापनाने व प्राचार्यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा :महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews