Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा

पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा

MahaeNews 1 week ago

Maharashtra Weather News : दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात बदल होत आहे. काही भागात तापमानाचा पारा 40 ते 45 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. अशातच हवामान विभागानं महत्वची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाने विदर्भासह राज्यातील काही भागांत पुढील 3 ते 4 दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर अंतर्गत कर्नाटक या भागांसह इतर अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात सरासरीच्या सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

▪️ ईशान्य भारतात सामान्य पाऊस अपेक्षित

▪️ देशाच्या इतर भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

▪️ हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवण्याचा सल्ला

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता

हवामान विभागाने राज्यात यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

▪️ अनेक जिल्ह्यांत तापमान ४०°C पेक्षा जास्त

▪️ उष्णतेची तीव्रता कायम

▪️ सर्वदूर मान्सून पाऊस सुरू होण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा लागू शकते

देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केलं आहे. राज्यात कुठे 45 तर कुठे 46 अंशापर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. अशातच गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात पुन्हा उष्णतेचा हाहा:कार बघायला मिळतो आहे. सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. अंगाची लाही-लाही करणारी उष्णतेची लाट अक्षरशः होरपळून काढत असल्याचे चित्र आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचे तीव्र आवाहन केले आहे. अकोला, अमरावतीसह वर्ध्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews