Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

MahaeNews 1 week ago

IAS Transferred : राज्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यासंदर्भातील अधिकृत आदेश ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले.

या फेरबदलामध्ये विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक, आयुक्त आणि महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्यांची परंपरा कायम ठेवत सरकारने पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत.

कोणाची कुठे बदली?

१. रुपेश जयवंशी (IAS:२००९) पुणे येथील 'महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे' व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईतील 'महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या' व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

२. श्रीधर दुबे (IAS:२०१४) यापूर्वी १९ मे २०२६ रोजी त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता, त्यात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथील 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (NRLM) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

३. निलेश सागर (IAS:२०१५) नवी मुंबईच्या 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (NRLM) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची आता पुणे येथील 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या' आयुक्तपदी बदली झाली आहे.

४. जगदीश मिनीयार (IAS:२०१५) पुण्याचे महिला व बालकल्याण आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोचे (CIDCO) मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. श्रीमती वर्षा लड्डा (IAS:२०१५) अमरावती महानगरपालिकेच्या महिला महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

६. डॉ. मंगेश गोंदवले (IAS:२०१५) गेल्या २३ जून २०२६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात बदल करून, डॉ. मंगेश गोंदवले यांची आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

७. पंकज देवरे (IAS:२०१६) मुंबईतील 'महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे' सचिव पंकज देवरे यांची एमएमआरडीए (MMRDA) मुंबई येथे 'सह महानगर आयुक्त' (Joint Metropolitan Commissioner) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे.

८. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:२०१६) पुण्याच्या 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या' आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुणे येथील 'महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या' व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) वर्णी लागली आहे.

सरकारकडून करण्यात आलेल्या या बदल्यांचा उद्देश विविध विभागांतील कामकाज अधिक परिणामकारक करणे आणि आगामी प्रशासकीय आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणे हा असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews