Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

शिक्षणतज्ज्ञ प्र. चि. शेजवलकर यांचे 92व्या वर्षी पुण्यात निधन

MahaeNews 5 years ago

प्रसिद्ध मराठी लेखक, व्यवस्थापनतज्ज्ञ, आणि शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर चिंतामण शेजवलकर उर्फ प्र. चि. शेजवलकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

प्रभाकर चिंतामण शेजवलकर उर्फ प्र. चि. हे व्यवस्थापनतज्ञ, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. बी एम सी सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. प्र.चि. शेजवलकर हे शरद पवारांचे शिक्षक होते. बी एम सी सी महाविद्यालयात शिकत असताना आणि त्यानंतर देखील शरद पवार यांच्याशी त्यांचे संबंध होते. त्यांनी व्यवस्थापन शास्त्र आणि विविध विषयांवरील विषयावरची 30 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागाचे ते प्रमुख होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते अध्यक्षही राहिले होते. पुणे स्टॉक एक्सचेंजचेही ते संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पी एच डी मिळवली आहे. वाणिज्य (कॉमर्स) शाखेचा अभ्यासक्रम मराठीतून विद्यार्थ्यांना शिकता यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम आज मराठीतून शिकता येतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews