Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!

टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!

MahaeNews 2 weeks ago

ENGW vs INDW 2nd T20i : वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आणि स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली.

टीम इंडियाने इंग्लंडसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे सामना जिंकला. टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता टीम इंडियाला ही आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील दुसरा सामना हा 30 मे रोजी होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना शनिवारी 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना ब्रिस्टोलमधील काउंटी ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

दरम्यान दुसऱ्या टी 20i सामन्यातून टीम इंडियात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. हरमनप्रीतला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचं स्मृती मंधाना हीने पहिल्या टी 20i सामन्याच्या टॉसवेळेस सांगितलं होतं. त्यामुळे आता हरमनप्रीतचं कमबॅक होतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews