किरण माने, अभिनेता
पंजाब, केरळ, कर्नाटक हे भारतात नाही का?
…की फक्त तुम्ही ज्या पक्षाच्या गटारात आहात, त्या पक्षाने ओढूनताणून सत्ता असलेली राज्येच 'भारत' आहेत? भक्तडुक्करपिलावळींनो तुमच्या अनपढ नेत्यांसारख्या बिनडोक आय टी सेलनं हे असले टुकार प्रश्न विचारायला लावून तुम्हाला धंद्याला लावलंय.
जरा रिसर्च करत जा, नाहीतर जेन झी घाण शिव्या देऊन अब्रूचा पंचनामा करते…
अरे येड्यांनो, NTA कोणाच्या हातात आहे? २०१७ मध्ये NTA तुमच्याच बांडगुळांनी स्थापन केलेली आहे. तिच्या कामकाजाची जबाबदारी थेट मोदी सरकारवर आहे. त्यामुळे देशात NEET, JEE, CUET आणि तत्सम राष्ट्रीय स्तरावर 'पेपर लीक' झाला तर थेट दिल्लीलाच जाब विचारायला पाहिजे. इतकं सरळ आहे ते. काय चाललीय तुमची केरळ, पंजाब वगैरे फालतूगिरी? जेन अल्फानं सुद्धा तुमच्या सर्वोच्च नेत्याचा बाजार उठवलाय ते असल्या मुर्खपणामुळेच !
सगळ्या देशाला हे कळालेले आहे की तुम्ही देशभक्ती च्या मुखवट्याआडून एका भ्रष्ट, नालायक पक्षाची अंधभक्ती करत आहात. लक्षात ठेवा, आमच्या पोरापोरींनी दिल्लीत आंदोलन केलं कारण पेपर लीक हा राष्ट्रीय प्रश्न आहे. जाब मोदींनाच विचारला जाणार.
तुम्हाला ते खटकत असेल तर समस्या आंदोलनात नाही,
तुमच्या गुलाम आणि पायचाटू मानसिकतेत आहे. खरी 'टुकडे टुकडे गँग' ही तुम्ही आहात जी आमच्या देशापासून पंजाब, केरळ आणि कर्नाटक सारखी समृद्ध राज्यं तोडू पाहते आहे. तुम्हाला याआधी पश्चिम बंगालकडूनही प्रॉब्लेम होता… तिथले पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या आधारानं सत्ता आल्यावर तुमच्या लिस्टमधून ते राज्य गायब झालं हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही.
तुमच्या आय टी सेलनं 'चीनी पाकिस्तानी एजंट' ठरवलेल्या भारतमातेच्या लेकरांनी तुमचे नाक ठेचल्यामुळे तुम्ही बहिसटला आहात हे मान्य… पण आता तरी भानावर या भक्तडुक्करांनो… देश जागा झालाय. सगळे हिशोब होणार, थंड घ्या. भारतमाता की जय!

