विक्रम वरे, बारामती
बारामतीत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासकीय भवन परिसरात अचानक झळकलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या फलकांमागे दादासमर्थकांचा हात असल्याची चर्चा रंगत असून, त्यातून काही विशिष्ट नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. "फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही - समस्त दादा प्रेमी," असा ठळक संदेश या फलकांवर झळकताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवरच हे फलक लावण्यात आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला समर्थकांचा वाढता उत्साह दिसत असताना, दुसरीकडे अशा आक्रमक फलकांमुळे संबंधित नेते आणि पक्षांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

