Thursday, 22 Jul, 6.10 pm महान्यूज LIVE

होम
भयानक : फाटलेल्या आभाळाने कुटुंब केलं उध्वस्त! भातलावणी करून घराकडे परतणारे कुटुंब ओढ्यात वाहून गेल्याची भीती! चार जण बेपत्ता! एका महिलेला वाचविण्यात यश!

सातारा : महान्यूज लाईव्ह

जावळी तालुक्यातील रेंगडेवाडी याठिकाणी शेतात भात लावणी करुन घराकडे परतणारे कुंटूंबिय ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या कुंटूंबातील 5 जणांपैकी एका महिलेला वाचविण्यात यश आले असून, 4 जणांचे शोधकार्य युध्दपातळीवर प्रशासनाकडून सुरु आहे.

ही माहिती तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जावळी -महाबळेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या जावळी तालुक्यात वेण्णा नदीला जाऊन मिळणारा रेंगडेवाडी याठिकाणी ओढा आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीने धोक्याची पातळी गाठली असून ओढ्यांनाही पुरसदृश्य परिस्थिती उदभवली आहे.

दरम्यान रेंगडेवाडी येथील कासूर्डे कुंटूंबीयातील पाच जण सदरील ओढा हा ओलांडत असताना अचानकपणे पाण्याचा अंदाज न आल्याने कासूर्डे कुटूंबिय ओढ्यातून वाहून जाऊ लागले. यामध्ये एका महिलेला वाचविण्यात यश आले असून सहदेव गणपत कासूर्डे (वय 60),भागाबाई सहदेव कासूर्डे (वय 50), तानाबाई किसन कासूर्डे (वय 50), रविंद्र सहदेव कासूर्डे (वय 30) यांचे शोधकार्य युध्दपातळीवर प्रशासनाकडून सुरु आहे.

दरम्यान,नागरिकांनी ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे कोणताही जिवाचा धोका न पत्करता ओलांडण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top