Saturday, 25 Sep, 9.15 am महान्यूज LIVE

होम
दौंडच्या पुर्व भागात वाटलुज येथे वाळू उपसावर कारवाई! सव्वा कोटीचा मुद्देमाल नष्ट! ५ जणांवर गुन्हे दाखल..पोलीस आणि महसूलची कारवाई..!

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्यातील पुर्व भागातील वाटलूज – मलठण येथील भीमा नदीपात्रात रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर दौंड पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. वाटलूज मलठण हद्दीत भीमा नदीच्या पात्रात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. याबाबतची माहिती दौंड पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली होती.

त्यानुसार स्वतः उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी महसूल विभागाच्या अधिकारी यांनी माहिती मिळाल्याठिकाणी छापा टाकला. यावेळी भीमा नदीच्या पात्रात पाच फायबर बोटी व पाच सेक्शन बोटींच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरूअसल्याचे निदर्शनास आले.

कारवाईसाठी पथक आल्याचे पाहून वाळू माफियांनी तेथुन अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशानुसार 10 ब्रास वाळू, 5 फायबर बोटी आणि 5 सेक्शन बोटी यांची किंमत 1 कोटी 15 लाख रुपये आणि 10 ब्रास वाळू 50 हजारांची असा एकूण 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

वाटलूज चे तलाठी नंदकुमार खरात यांनी दिलेल्या दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने नाना शेंडगे, महंमद शेख,शरद शेंडगे, माऊली झिटे, सलीम शेख या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस,

पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, सहाय्यक फौजदार पोपट जाधव, पोलीस हवालदार दिपक वायकर, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, पोलीस नाईक अमोल गवळी, किरण राऊत, विशाल जावळे, अमीर शेख, पोलीस शिपाई अमोल लोंढे, देवकाते, अभिजित गिरमे, नाना उबाळे, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, विजय खरतोडे, नंदकुमार खरात, जयंत भोसले, दिपक आजबे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top