Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धूळ खात पडलेल्या वाहनांना मिळाला 'मालकांचा' हात. बारामती तालुका  ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!

धूळ खात पडलेल्या वाहनांना मिळाला 'मालकांचा' हात. बारामती तालुका ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!

बारामती : महान्यूज लाईव्ह

पोलिस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांना अखेर त्यांच्या मूळ मालकांचा आधार मिळाला आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १३ वाहने शोधून काढत ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या आणि काही प्रकरणांतील मुद्देमाल म्हणून जप्त असलेल्या वाहनांची माहिती तपासण्यात आली. आरटीओ नोंदी, जुने गुन्हे रेकॉर्ड, वाहनांचे क्रमांक आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी वाहन मालकांचा शोध घेतला.

यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुमारे ५ लाख रुपये किमतीची १३ वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली. हरवलेली किंवा जप्त झालेली वाहने पुन्हा मिळाल्याने वाहनधारकांनी बारामती ग्रामीण पोलिसांचे आभार मानले.

दरम्यान, पोलिसांनी अशीच आणखी सुमारे ५० बेवारस वाहनांची नोंद केली असून, त्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बारामती ग्रामीण पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live