Saturday, 25 Sep, 1.12 am महान्यूज LIVE

होम
जबरदस्त..! 'सीएमआयएस' ही यंत्रणा पोलिसांना आता पोहोचवणार गुन्हेगारांच्या घरापर्यंत. आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन..!

बारामती : महान्यूज लाईव्ह

असं म्हणतात की गुन्हेगार कितीही शातिर असला तरी कायद्याचे हात बहुत लंबे होते है… त्यामुळेच पोलीस शोधत असलेल्या नवनव्या तंत्रज्ञानाचा बऱ्याचदा गुन्हेगार देखील दोन पावले पुढे जाऊन पळवाटा शोधतात आणि त्या तंत्रज्ञानाला मात करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच पोलिस यंत्रणेला देखील सातत्याने सतर्क राहावे लागते. त्याचाच एक भाग म्हणून आता आरोपी तात्काळ सापडावा याकरता सीएमआयएस हे नवे सॉफ्टवेअर पोलिसांच्या दिमतीला मिळणार आहे. आज (ता. 25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत याची सुरुवात होईल.

प्रत्येक आरोपी च्या घराचे लोकेशन अंतरा सहित शोधण्याचे काम हे ॲप करणार आहे. त्याचबरोबर आरोपीचा डिजिटल क्रिमिनल फोटो अल्बम तयार करेल. तडीपार गुन्हेगारांची घटकनिहाय माहिती ठेवेल. घटक निहाय व गुन्हे पद्धतीनुसार गुन्हेगारांची यादी देखील यामध्ये तयार होणार आहे. आय मार्क टेक्नॉलॉजी या सोलापूरच्या संस्थेने हे सॉफ्टवेअर बनवले आहे.

पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे हे ॲप तयार केले असून, या पदाचा वापर रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी होणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा पत्ता आणि इतर माहिती एकत्रित करून एका मोबाईल ॲप मध्ये समाविष्ट केली जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. आज पोलिस दलासाठी या सॉफ्टवेअरचे हस्तांतरण होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची सर्व माहिती भरून घराचे पत्ते व अद्यावत फोटो भरली जाणार आहे. यामुळे बदलून आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोपीचे नेमके राहण्याचे ठिकाण करण्यास मदत होणार आहे. ब्रिटिश काळापासून पोलीस दलाच्या रेकॉर्ड मध्ये आरोपीचे हिस्ट्री शीट करण्याची पद्धत आहे. आता बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना कमी वेळेत आरोपी ची संपूर्ण माहिती अचूक मिळावी यासाठी हे ॲप मदतीचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top