Saturday, 25 Sep, 1.18 am महान्यूज LIVE

होम
कधीकाळी भजी आणि चहा विकला होता त्याने.! आता त्याच्या डोक्यावर प्रतिष्ठेची कॅप आणि लाल दिवाही असेल.. काटेवाडीच्या सामान्य कुटुंबाची असामान्य कामगिरी..!

काटेवाडी च्या अल्ताफ शेख यांचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश

बारामती : महान्यूज लाईव्ह

काल संध्याकाळी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि या निकालाकडे नजर लावून बसलेल्या अल्ताफ च्या मित्रांचे चेहरे उजळले.. बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अकॅडमी मधील उमेदवारांनी अक्षरशः जल्लोष केला आणि इकडे अल्ताफच्या घरी ऐन पावसाळ्यात जणू दिवाळीचे क्षण, रमजानचे क्षण साजरे झाल्याचा आनंद कुटुंबियांच्या चेहऱ्यावर होता..!

घरची परिस्थिती बेताची असतानाही देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आई वडिलांचे स्वप्न खरे करून दाखवले. अखेर काटेवाडी च्या अल्ताफ शेख याने आयपीएस होण्याचे स्वप्न साकार केले.

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आलताफ शेख यांनी आज जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम केलेले अल्ताफ आता थेट आयपीएस अधिकारी बनले आहेत. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील पहिला आयपीएस अधिकारी बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे.

यूपीएससी परीक्षेत अल्ताफ मोहम्मद शेख यांनी 545 वा क्रमांक मिळवला आहे. या आधी अल्ताफ यांनी सन 2015 ची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय गृह खात्यामध्ये उपायुक्त म्हणून ते रुजू झाले होते. उत्तर प्रदेश मधील सीतापुर येथून त्यांनी केलेली सुरुवात, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच त्यांची बदली उस्मानाबाद येथे झाली होती. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी यूपीएससी ला गवसणी घातली आणि आता पुन्हा नोकरी करत-करत ते आयपीएस पदावर पोचले आहेत. बारामतीतील राष्ट्रवादी करिअर अकॅडमी चा पहिला विद्यार्थी आहे, ज्याने आयपीएस पदावर गवसणी घातली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top