Thursday, 22 Jul, 6.47 pm महान्यूज LIVE

होम
मावळ तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित

पुणे: महान्यूज लाईव्ह

मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने काही बहुतांश गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. लोणावळा, खंडाळा व परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती झाली होती. लोणावळा खंडाळा व परिसरात अवघ्या तीन तासांतच १७५ मिलीमीटर पाऊस झाला
शहर व ग्रामीण भागांतील ओढे, नाले व नदीकाठच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे.

घरांमध्ये अगदी चार – चार फूटांपर्यंत पाणी साचले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत कोसळत होता. पहाटे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील ओढे, नाले व नदीकाठच्या अनेक गावांतील घरांना पुराने वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पाण्यात अडकले.

पुराच्या पाण्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पहाटेच लोक घराबाहेर पडले. लोणावळ्यात २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस झाला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पवना धरण ५५.७ टक्के भरले आहे.

पुणे मुंबई रेल्वेसेवा बंद

मुसळधार पावसामुळं खंडाळा घाटात मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळं मुंबई- पुणे रेल्वे सेवा पूर्वपणे ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. त्यांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top