Thursday, 22 Jul, 4.14 pm महान्यूज LIVE

होम
नीरा, भिमा नदीकाठी सावधानतेचा इशारा! भिमाचा विसर्ग सुरु; तर नीरा नदीपात्रात केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते! जलसंपदा विभागाचा इशारा!

जलसंपदा विभागाचा सतर्कतेचा इशारा

बारामती : महान्यूज लाईव्ह

धरण क्षेत्रात जोरदार सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर भरपूर असल्याने नदीपात्रात केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते असा इशारा जलसंपदा विभागाने दिला असून, नदी काठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.

निरा देवघर धरण पाणलोट श्रेत्रात पावसाचा जोर भरपुर असल्याने पाणी पातळी धरणाची पाणी पातळी 659.40 मीटर अर्थात 8280 दलघफू म्हणजे 69 टक्के इतकी झाली आहे. मागील 12 तासात 2422 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आलेला आहे. म्हणजे सरासरी ५६ हजार ४५ क्युसेक्सने विसर्ग येत असल्याने उद्या सकाळपर्यंत पाणीसाठयात वाढ जास्त प्रमाणात होऊ शकते.

निरा देवघर धरणातून पाणी वीर धरणात येते. वीर धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीर धरणातून पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जाईल. खंडाळा, फलटण, माळशिरस, बारामती, पंढरपूर, तालुक्यातील नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून
उद्या (ता. २३) दुपारनंतर पाणीसाठा व पडणारा पाउस बघून निर्णय घेतला जाइल असे साहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.

त्यामुळे नदीपात्रात पाणी केव्हाही सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

उजनीतही पाणी विसर्ग वाढला; भीमा नदीच्या काठावर सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या साखळीमध्ये संततधार पाऊस सुरू असून खडकवासला धरण 96 टक्के भरले आहे त्यामुळे नदीपात्रालगत दहा हजार 96 किसने नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान पानशेत 60 टक्के वरसगाव 52 टक्के टेमघर 36 टक्के तर खडकवासला 96 टक्के भरले आहे या चारही धरणांचा सध्याचा एकूण पाणीसाठा 16 0 37 इतका टीएमसी असून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे नदी पात्रालगत च्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top