Saturday, 25 Sep, 6.20 am महान्यूज LIVE

होम
परमवीर सिंह यांच्यासह 25 अधिकारी होणार निलंबित! पोलीस महासंचालकांनी दिला प्रस्ताव!

मुंबई: महान्यूज लाईव्ह

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेले माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह राज्यातील 25 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे दिला आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाला दिला असून यामध्ये महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या 25 जणांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांचा तसेच विविध प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून घोषित झालेल्या अनेक सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच परमवीर सिंह यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता हा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान गृह विभागाने निर्णय घेतल्यास महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी घटना असेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top