Thursday, 22 Jul, 5.39 pm महान्यूज LIVE

होम
पुणेकरांनो सावधान! नदीपात्रात पाणी पातळी वाढतेय!

अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात छोट्या खडकवासला (Khadakwasla dam) धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा 88 टक्क्यांचा (88 percent) पुढे गेल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा विसर्ग सोडायला सुरुवात झाली. यामुळे शहरातील मुळा आणि मुठा या नद्यांमध्ये पाणी येणार आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली की ‘खडकवासला’तून २ हजार ४६६ क्युसेक्स क्षमतेने पाणी विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला धरणात आज दुपारी ३ वाजेपर्यंत १.७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी ४:३० वाजता २ हजार ४६६ क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनो सावधानता बाळगण्याची गरज आहे नदीपात्रालगत नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top