Thursday, 22 Jul, 5.22 pm महान्यूज LIVE

होम
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! केशवनगर, मुंढवा हद्दीमध्ये तीन ठिकाणी छापे टाकून बनावट विषारी ताडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त!

अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह

शहरातील केशवनगर, मुंढवा, पुणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून बनावट विषारी ताडी बनवण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेड (C H ) 888 किलो रसायन तसेच सॅकरीन व सायट्रिक ऍसिड इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एकूण 7लाख 31 हजार 590 इतकी आहे. यासह वाहतूक करण्यासाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो ही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी सराईत गुन्हेगार प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय 57 वर्षे रा. शीत रंग निवास घर नंबर 137 स. नं. 5 केशवनगर पुणे व नरेंद्र भारत काळे वय 25 वर्षे रा. गायरान वस्ती, केशवनगर, पुणे) यास अटक करून लष्कर कोर्टात हजर केले असता त्यांना दिनांक 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व जिल्ह्याचे अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन विभागाचे दुय्यम निरीक्षक दत्तात्रय माकर, दुय्यम निरीक्षक नवनाथ मारकड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हनुमंत इंदलकर, जवान गोपाळ कानडे, माधव माडे, जयराम काचरा व शरद हांडगर यांनी केली असून पुढील तपास निरीक्षक श्री नंदकुमार जाधव हे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top