Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रात्री उशिरापर्यंत बैठका, सकाळी सातलाच रुग्णालयात पाहणी; बीडमध्ये सुनेत्रा पवारांचा 'ॲक्शन मोड'

रात्री उशिरापर्यंत बैठका, सकाळी सातलाच रुग्णालयात पाहणी; बीडमध्ये सुनेत्रा पवारांचा 'ॲक्शन मोड'

बीड, दि. ३१ जुलै : उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दोन दिवसांच्या बीड दौऱ्यात विकासकामे, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेचा घेतलेला धडाकेबाज आढावा चर्चेचा विषय ठरला आहे.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी नेमके सात वाजता त्यांनी जिल्हा रुग्णालयात अचानक भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली.

गुरुवारी दिवसभर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांसोबत विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेताना नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत बैठका सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल होत त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विकासकामांना मोठी गती मिळाली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांना निधी मंजूर झाला आणि प्रशासनानेही वेगाने कामे सुरू केली. त्यांच्या निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live