Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते, तरीही.'; घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा

'बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते, तरीही.'; घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा

रिॲलिटी शोमध्ये जे दिसतं तेच खरं असतं का? की टीआरपीसाठी एडिटिंगचा खेळ खेळला जातो? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण, 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 6) घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेने (Divya Shinde) शोच्या मेकर्सवर असे काही गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

सदस्यांना धमकावल्याप्रकरणी हकालपट्टी झालेल्या दिव्याने थेट ‘बिग बॉस’वरच पक्षपातीपणाचा आणि हलगर्जीपणाचा आरोप केलाय.

“जीवाची काहीच किंमत नाही का?” घरातून बाहेर पडताच दिव्याने पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ती म्हणाली, “बिग बॉसच्या टीमला माझ्या आजारपणाबद्दल आधीच कल्पना होती. त्यांनी काळजी घेण्याचं वचनही दिलं होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा माझा ऑक्सिजन कमी होत होता, मी मरणाच्या दारात होते, तेव्हा मला अक्षरश: दोन दिवस इंजेक्शन दिलं गेलं नाही.” मी जोरात रडत होते, पण कुणालाही पाझर फुटला नाही, असा धक्कादायक दावा तिने केला आहे.

Divya Shinde Allegations On Bigg Boss

दिव्याचा आरोप आहे की, तिला खलनायिका ठरवण्यासाठी मेकर्सने सोयीस्कर एडिटिंग केलं. “मी कन्फेशन रुममध्ये स्वतःहून शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, कारण माझ्या मान-सन्मानाचा प्रश्न होता. पण ते प्रेक्षकांना दाखवलंच नाही,” असं ती म्हणाली. इतकंच नाही तर, प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) आणि राकेश बापटसोबत (Rakesh Bapat) झालेलं महत्त्वाचं संभाषणही चॅनेलने कट केल्याचा दावा तिने केलाय. “मला सतत ‘पोक’ केलं गेलं, पण माझी बाजू मांडणारं फुटेज कधीच समोर आलं नाही,” असं सांगताना दिव्याला अश्रू अनावर झाले होते.

आता दिव्याच्या या सनसनाटी आरोपांवर वाहिनी किंवा महेश मांजरेकर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha