Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'वीण दोघातली तुटेना' मालिकेत स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न; चिंगीचा 'तो' रिपोर्ट पाहून मोठी खळबळ!

'वीण दोघातली तुटेना' मालिकेत स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न; चिंगीचा 'तो' रिपोर्ट पाहून मोठी खळबळ!

खाद्याच्या लग्नात अचानक एखादी मुलगी गरोदर असल्याचा रिपोर्ट घेऊन आली, तर काय होईल? झी मराठीवरील 'वीण दोघातली तुटेना' (Veen Doghatli Tutena) मालिकेत असाच एक भन्नाट आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग लवकरच पाहायला मिळणार आहे.

एकीकडे स्वानंदीच्या (Swanandi) आयुष्यात समरच्या रूपाने प्रेमाचे वारे वाहत आहेत, तर दुसरीकडे अंशुमनच्या लग्नाची (Anshuman wedding) जोरदार तयारी सुरू होती. पण याचदरम्यान स्वानंदीच्या हाती चिंगीचा प्रेग्नेंसी रिपोर्ट लागतो आणि या शांत कथानकाला एक मोठा धक्कादायक ट्विस्ट मिळतो.

Veen Doghatli Tutena Episode

झी मराठीने नुकताच या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला असून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. चिंगीला प्रेमाची खोटी वचनं देऊन अंशुमन अगदी निवांतपणे दुसऱ्याच मुलीशी बोहल्यावर चढणार होता, पण आता त्याचे मनसुबे उधळले जाणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि व्हायरल प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, स्वानंदीला जेव्हा चिंगी गरोदर असल्याचं समजतं, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. ती थेट चिंगीला जाब विचारते, ज्यावर चिंगी रडत “मला काहीच कळत नाहीये” असं हतबल होऊन सांगते.

त्यामुळेच स्वानंदीचा संताप अनावर होतो. तिकडे अंशुमनच्या गळ्यात हार पडणार इतक्यात स्वानंदी चिंगीचा हात धरून थेट भर मांडवात एन्ट्री घेते. “हे लग्न होऊ शकत नाही, कारण तुमच्या मुलाने या घराची लाज घालवलीय,” असा मोठा गौप्यस्फोट करत ती राजवाडे कुटुंबासमोर अंशुमनचे बिंग फोडते.

या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. सोशल मीडियावर चाहते ‘आता मालिका पाहण्यात खरी मजा येईल’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे, अनेकांनी ‘मालिकेत अधिरा खूप दिवसांपासून का दिसत नाही?’ असा सवालही विचारलाय. आता स्वानंदी अंशुमनची कशी बँड वाजवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha