Monday, 18 Nov, 9.31 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
१४-१५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याने केला गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा : ‘भाजपमध्ये गेलेले व अपक्ष असे पंधरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत़ मात्र आम्ही मेगाभरती करणार नसून, मेरिटवर भरती करू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी झाली. जयंत पाटील यांनी या बैठकीला जाताना माध्यमांशी सवांद साधला. ‘जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे आम्ही आताच जाहीर करणार नाही. ते त्यांच्यासाठी अडचणीचे ठरेल,’ असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

सत्ता स्थापनेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘भाजपची विचारधारा व आमची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे़. त्यामुळे आम्ही कधीही त्यांच्याबरोबर जाणार नाही,’ असे म्हणत भाजप सोबत आम्ही जाणार नाही अशी ठाम भूमिका पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या बहुमतामुळे विरोधी पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी जोमाने मोर्चेबांधणी करून ‘अब की बार २२० पार’ या भाजपच्या भूमिकेला राष्ट्रवादी व कॉंग्रेसने रोखले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top