Monday, 23 Sep, 11.46 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'आघाडीचे तिकीट घ्यायलाही कोणी तयार नाही'

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असून सगळ्याच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

याच पार्श्वभूमीवर अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. तसेच जोमाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी आघाडीवर चांगलीच शाब्दिक तोफ टाकली. ते धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती 220 जागांवर विजय मिळवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर आणले आहे, असे यावेळी दानवे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना दानवे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना महायुतीने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या निवडणुकीत आघाडीचे तिकीट घ्यायलाही कोणी तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जनता पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top