Wednesday, 27 Jan, 9.34 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र
अभिमानास्पद : आयसीसी क्रमवारीत विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर !

मुंबई : सुधारित आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल) एकदिवसीय रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या नव्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व हिटमॅन रोहित शर्मा यांनी घवघवीत यश मिळवल्याचं दिसून येत आहे. विराट कोहलीने या क्रमवारीत पहिले तर रोहित शर्माने दुसरे स्थान कायम ठेवलं आहे.

तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली याने भारतीय संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये एकदिवसीय सामने खेळले होते. मात्र, रोहित शर्मा याला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय सामन्यांना मुकावं लागलं होतं.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने ८९ आणि ६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट कोहली याच्या गुणांमध्ये चांगली वाढ झाली होती. सद्या तो ८७० गुणांवर आहे. तर, रोहित शर्माने कोरोना काळापासून एकही वन-डे सामना खेळला नसून ८४२ गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा ८३७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (722) हा गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान (701) हा दुसऱ्या व भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ७०० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

टॉप-५ फलंदाज –

  1. विराट कोहली (भारत)
  2. रोहित शर्मा (भारत)
  3. बाबर आजम (पाकिस्तान)
  4. रॉस टेलर (न्यूझीलंड)
  5. ऍरॉन फिन्च (ऑस्ट्रलिया)

टॉप-५ गोलंदाज –

  1. ट्रेन्ट बाउल्ट (न्यूझीलंड)
  2. मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान)
  3. जसप्रीत बुमराह (भारत)
  4. मेहंदी हसन (बांगलादेश)
  5. क्रिस वोक्स (इंग्लंड)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top