महाराष्ट्र देशा
'भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली?'

नागपूरः- गेल्या जून महिन्यापासून सुशांत सिंह राजपूतचे संशयित आत्महत्त्या प्रकरण देशभर गाजत आहे. सुशांत बद्दल देशभरात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. यात भारतातील विविध वृत्तवाहिन्यांनी उडी घेल्यामुळे या प्रकरणाचे रिपोर्टिंग एकतर्फी होत असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे रिपब्लिक वृत्त वाहिनीचे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांना टीकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत आत्महत्त्या प्रकरणाचा तपास केला याबाबत शंका उपस्थित करत अर्णब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अर्णब गोस्वामी यांनी राज्यातील मोठ्या नेत्यांना अंगावर घेतले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. आता अर्णब यांच्या संभाषणाचे तपशील व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ माजली आहे. अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संभाषणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यावरून कॉंग्रेससह विरोशी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. अर्णब यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. ‘भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब असून सीक्रेट अॅक्ट नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. याबाबत आम्ही अर्णब यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबत लीगल ओपिनियन मागवलं आहे,’ असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. बालाकोटच्या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी अर्णबला कशी मिळाली. एखाद्या देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार असेल तर त्याची माहिती संरक्षण मंत्री आणि तीन-चार महत्त्वाच्या नेत्यांना असते. केंद्रीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली जात नाही. मग अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.
- पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण. अजितदादांना राणेंचा टोला
- राज्यात आज २१ हजार ६१० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच - बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- ग्रामसेवक मृत्यू प्रकरण; विस्तार अधिकाऱ्यासह आणखीन एक ग्रामसेवक निलंबित
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.