Tuesday, 15 Oct, 9.55 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'बीड सोडून स्वत:च्या जिल्ह्यात लक्ष घाला, एखादी जागा वाढेल'

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. तसेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी त्या म्हणाल्या, ‘बारामतीत लक्ष न घालता शरद पवार हे बीडमध्ये शून्य जागा आहेत तिथं लक्ष घालत आहेत. शरद पवारांनी स्वत:च्या जिल्ह्यात लक्ष घालावं. म्हणजे एखादी जागा तरी वाढेल. बीड जिल्ह्यात ते शक्य नाही, असे भाजपच्या नेत्या व परळी मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आता स्वत:चे नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे. शरद पवारांनी बीड जिल्ह्याला राजकारणाशिवाय काहीच दिलं नाही. विकासाची कवडी पण दिली नाही. आम्ही शाश्वत विकास दिला. तुम्ही काय दिले, एखादा बंधारा तरी दिला का?’ असे म्हणत मुंडे यांनी पवारांना सवाल केला.

दरम्यान, सभेदरम्यान पुढे बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते व परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘शरद पवारांच्या सभांची आम्हाला सवय झाली आहे. पण पवारांना वारंवार जिल्ह्यात यावं लागतं हे धनंजय मुंडेंसाठी काही चांगलं लक्षण नाही. तरुणांनी वयोवृद्धांना फिरवणं ही चांगली गोष्ट नाही. पवार साहेबांनी येवढं मोठं विश्व निर्माण केलं. धनंजय मुंडेंच्या टीममुळे पुन्हा त्यांना कष्ट करावं लागत आहे. राष्ट्रवादीने विश्वास गमावला आहे. त्यामुळे भविष्य आमचं आहे,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top