Tuesday, 19 Nov, 11.53 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
ब्रेकिंग : मराठा आरक्षणा संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

टीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयने वैध ठरवलेल्या मराठा आंदोलनाला सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले आहे. याबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. २२ जानेवारी रोजी मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. खरे तर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण दिले होते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला आणि त्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. घटना खंडपीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावरील 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top