Wednesday, 03 Jul, 3.26 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
चंद्रकांत पाटलांचे कौतुक वाटत, महसूल खात्यातून कोणी नाराज होऊन गेल नाही : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे पावसाळी अधिवेशन मंगळवारी संपले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानत येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मीचं मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याचे आणि त्या खात्याचे मंत्री असणारे चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक केले.

याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महसूल व सार्वजनिक बांधकाम यासारख्या खात्यांवर काम करत असताना चंद्रकांतदादा यांच्या कार्यालयातून कधी कुणी नाराज होऊन गेलं नाही. तसेच गेली साडे चार वर्षे उत्कृष्ट काम करून आपल्याकडील जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळल्या. मराठा आंदोलन असेल, आरक्षण असेल यासारखे अनेक प्रश्न चंद्रकांतदादांनी उत्तमरित्या सांभाळले. गेली ३० वर्षांपासून दादांचा माझा परिचय आहे, या साडेचार वर्षाच्या कालावधीत दादांनी नेहमीच सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम केलं. त्यांच्याकडे आपला प्रश्न घेऊन आलेला एकही व्यक्ती कधीही निराश होऊन परत गेला नाही.

दरम्यान चंद्रकांत दादांचे मुख्यमंत्री कौतुक करत असले तरी विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले असून बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top