Wednesday, 26 Jun, 8.21 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
चंद्रकांत पाटलांवर घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीकडून राजीनाम्याची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

बालेवाडी येथे एक भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव होता. शिवप्रिया रिअॅलिटर्स उमेश वाणी यांनी ही जागा आपली असल्याची दाखवत प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. दरम्यान याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली परंतु चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सची असल्याचा निकाल देत जमिनीवर ३०० कोटींचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने यामुद्यावरून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत. त्यामुळे बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटीलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top