Saturday, 14 Dec, 6.16 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी धक्कादायक : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्कादायक प्रसंग होता. असं विधान भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केल आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ” राष्ट्रपती राजवट संपली याचा आनंद मला झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी त्याचं अभिनंदनही केलं. पण अजित पवार यांच्यासोबत गनिमी काव्याने केलेल्या सरकार स्थापनेचा फारसा आनंद झाला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता.

त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या गनिमी काव्याची कल्पना होती का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मला याबाबत काहीच कल्पना नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असूनही मला या निर्णयाबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा तो माझ्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेला बसला तसेच धक्का मलाही बसला होता.

अजित पवारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, अजित पवार स्पष्टवक्ते नेते आहेत. पण माझा त्यांच्याशी वैयक्तिक कधीही संबंध आला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलता येणार नाही. असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत बोलणे टाळले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top