Monday, 18 Nov, 8.42 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते राहणार : दानवे

टीम महाराष्ट्र देशा : ‘आमच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसून आमचे नेते हे देवेंद्र फडणवीस हेच राहणार,’ असे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजप युतीचे जनक म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्याकडे पाहिले जाते. या नेत्यांनी घालून दिलेले सुत्र दोन्ही पक्षांनी मानावे आणि जनमताचा आदर करावा,’ असे दानवे म्हणाले.

पुढे दानवे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आमचे नेते फडणवीस राहणार आहेत. नेतृत्व कोणतेही बदल होणार नसल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, ‘एनडीएमध्ये जी फुट पडली आहे ती बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये असली पाहिजे, अशी खंत आठवले यांनी बोलून दाखवली. तसेच महाराष्ट्रामध्ये 225 जागा मिळायला पाहिजे होत्या. पण आपापसात दोन्ही पक्षांच्या बंडखोरीमुळे चाळीस-पन्नास जागांचा फटका बसला हे मी बैठकीत सांगितले, असे आठवले म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>