Saturday, 12 Oct, 7.26 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, अशी खोचक टीका भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी ही टीका केली आहे.

जो पर्यंत बीड मधील सर्व उमेदवारांच्या डोक्याला गुलाल लागणार नाही, तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला आहे. या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप युतीचेचं उमेदवार निवडून येणार आहेत. असेही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते पक्षांतर करून राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

या विधानसभेला बीड जिल्ह्यात हायव्होल्टेज लढती पाहिला मिळणार आहेत. त्यात परळीची लढाई चांगलीचं गाजणार असल्याचं बोललं जात आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे या मतदारसंघातून आमने सामने येणार आहेत. परळी मतदारसंघातून पंकजा यांनी २००९ आणि २०१४ ला धनंजय मुंडेंना पराभूत केले होते. त्यामुळे आता बहिण - भावात कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>