Sunday, 24 Jan, 3.57 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'एल्गार परिषदेचे ना वक्ते माहित ना परिषदेचा उद्देश मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?'

पुणे:- यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली होती. शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला देखील परवानगी नाकारली होती.

डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. एल्गार परिषदेवरून इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी गेल्या वर्षी २१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र, परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु आता 30 जानेवारीला होणाऱ्या एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या परवानगीवर ब्राह्मण महासंघाने आक्षेप नोंदवत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ब्राह्मण महासंघाने आज पुण्याच्या स्वारगेट पोलिसांना निवेदन देत एक महिन्यात असा काय फरक पडला की तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी दिली?, असा सवाल केलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून 1 जानेवारीला एल्गारच्या आयोजनाला नकार देणारे पोलीस 30 जानेवारीला मात्र परवानगी देत आहे. ना वक्ते माहिती आहेत, ना परिषदेचा उद्देश ना निम्मित ना गरज.? पण परवानगी मात्र दिली. ती कोणत्या कारणामुळे दिली?, असे सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top