Sunday, 15 Sep, 11.48 am महाराष्ट्र देशा

देश-विदेश
'हा' नेता खोटं वय दाखवून १७ व्या वर्षी बनला होता पंचायत समिती सदस्य

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणात आलो.. वय वाढवून वयाच्या १७ व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो असा गौप्यस्फोट पाटील यांनी शेकापच्या मेळाव्यात केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना आमदार जयंत पाटील यांनी वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणात आलो.. वय वाढवून वयाच्या १७ व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो असं विधान केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

दरम्यान, पाटील यांच्या या विधानावरून असं स्पष्ट होते की शाशकीय यंत्रणेला हाताशी धरून सत्तेसाठी काहीही करू शकतात. भारतामध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी २१ वर्षे तर आमदारकीसाठी २५ वर्षे वयाची अट आहे. त्यामुळे पाटील यांच्या वक्तव्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

दरम्यान, या मेळाव्यात शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांनी माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, मी निवडणूक लढवणार नाही असं विधान केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top