Thursday, 27 Feb, 11.07 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती'

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनातील मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. अशातच दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, 'भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही' असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती,' असं आव्हाड म्हणाले.

तसेच अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका रजनीकांत यांनी केली आहे. तसेच दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना बुधवारी रात्री केंद्र सरकारने जाहीर केली. महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बदलीची शिफारस केली होती, परंतु दोन आठवड्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top