Saturday, 14 Dec, 4.56 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
जम्बोच्या मते 'हा' युवा फलंदाज आहे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी एकदम परफेक्ट

टीम महाराष्ट्र देशा : श्रेयस अय्यरने ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांत चौथ्या क्रमांकावर आतापर्यंत उत्तम फलंदाजी केली असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा त्याने याच स्थानावर फलंदाजी करावी, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शुक्रवारी व्यक्त केली.

वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका होणार आहे. चेन्नईमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. शिखर धवन या मालिकेत खेळणार नसल्यानं के. एल. राहुल याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे.

श्रेयस अय्यर हा परिपक्व फलंदाज आहे. त्यानं चौथ्या क्रमांकावर खेळावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. वेस्ट इंडीजची फलंदाजी मजबूत आहे. भारतीय गोलंदाजांना त्याविरोधात सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या मालिकेतून गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही वन डे मालिकेतून माघार घेतली आहे.वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमार जखमी झाला. त्याला पुन्हा हर्नियाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. भुवनेश्वरच्या जागी आता एका मुंबईच्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे.

आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.भारताकडे एकापेक्षा एक सरस गोलंदाज असताना शार्दुल ठाकूर संघात स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यातही भुवनेश्वरला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघातून बाहेर होता. विंडीजविरुद्ध टी20 मालिकेत तो खेळला पण आता दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अद्याप त्याच्या दुखापतीबद्दल संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय़कडून सांगण्यात आलेलं नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top