Saturday, 28 Nov, 3.48 pm महाराष्ट्र देशा

आरोग्य
'कोरोना व्हायरसचा जन्म भारतातच' चीनच्या संशोधकांचा जावईशोध !

वुहान: जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातले असताना चीनच्या संशोधनाने मात्र अजब दावा केला आहे. जगभरात कोरोनाव्हायरस ने थैमान घातला आहे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेला देखील एक वर्ष पूर्ण झाला आहे. चीनच्या वुहान शहरांमध्ये कोणाचा जन्म झाला होता या व्हायरसमुळे लाखो लोकमृत्युमुखी पडले असताना चिनने याचे खापर आता भारताच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या एका वैज्ञानिकाने कोरोनाचा चा जन्म व भारतातून झाला असल्याचा आरोप केला आहे. यादीदेखील भारतातून चीनमध्ये आयात झालेल्या पदार्थांवर कोरोना व्हायरस असल्याच चिनीने म्हटलं होतं.

चीनची अकादमी ऑफ सायन्सेजच्या वैज्ञानिकांनी हा जावईशोध लावला आहे. त्यांनी सांगितले की 2019 च्या उन्हाळ्यात भारतामध्ये हा व्हायरस जन्माला आला होता. हा व्हायरस जनावरांद्वारे दूषित पाण्यातून माणसांमध्ये आला यानंतर तेथून हा व्हायरस वुहाणला आला. जिथे पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडला. चीनच्या एका वृत्तपत्रांमध्ये याबाबतचा अहवाल छापून आला आहे ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झाले त्याचा शोध घेऊन या व्हायरसचा शोध समजू शकतो असे या वैज्ञानिकानी म्हटले आहे.

चिनी संशोधकांनी या पद्धतीचा वापर करून दावा केला आहे की वुहानमध्ये जो व्हायरस सापडला तो खरा नव्हता हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया किंवा सर्बियामध्ये जन्माला आल्याचे संकेत मिळाले आहेत भारत आणि बांगलादेश मध्ये कमी म्युटेशन झालेले व्हायरस सापडले आहेत. जे चीनचे शेजारी देश आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरस भारतात जन्माला आल्याची शक्यता अधिक आहे म्युटेशनला लागलेला वेळ आणि या देशातून घेण्यात आलेल्या कोरोनाव्हायरस चे नमुने पाहून वैज्ञानिकांनी दावा केला की हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा पसरला आहे.

ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाचे संशोधक डेव्हिड रॉबर्ट्स यांनी सांगितले की चीनचे संशोधन खूपच सदोष आहे हे संशोधन कोरोना व्हायरस बाबत आमच्या ज्ञानात जराही भर घालत नाही. चिनी याआधी ही कोणताही पुरावा न देता अमेरिका आणि इटलीवर कोरोनाव्हायरस पसरवण्याचा आरोप केला आहे. डब्ल्यूएचओला मिळालेल्या पुराव्यांनुसार कोरोनाव्हायरस चीनमधील तयार झाला आहे डब्ल्यूएचओने तपासणी पथकही चीन ला पाठवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top