Sunday, 24 Jan, 9.31 am महाराष्ट्र देशा

आरोग्य
'ममतांना 'जय श्रीराम' घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे'

कोलकाता : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे विक्टोरिया मेमोरियल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एकाच मंचावर आले होते. मात्र यावेळी मंचावर ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी आल्यानंतर जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आला यावर ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या होत्या.

यावरून भाजपचे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज आणि ममता बॅनर्जी वर घणाघात केला आहे. यावेळी जय श्रीराम च्या घोषणा दिल्यानंतर ममतांनी भाषणास नकार दिला. 'ममता बॅनर्जी यांना 'जय श्रीराम' घोषणा देणे म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे' असे ट्विट करत वीज यांनी मतांवर निशाणा साधला आहे.

यावेळी ममता म्हणाल्या, 'कोणाला बोलल्यानंतर आपमान नाही करायला हवा, शासनाच्या कार्यक्रमाचा एक नियम असतो. हा सरकारी कार्यक्रम आहे एखाद्या पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे या कार्यक्रमात मी बोलणार नाही.' असे म्हणत ममतांनी या कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top