Wednesday, 25 Sep, 6.06 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'मंत्रीपद मिळूनही मुंडेसाहेबांच्या वारसदारांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही'

टीम महाराष्ट्र देशा : अखेर विधानसभेचे बिगुल वाजले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्व पक्षांनी प्रचारला सुरुवात केली आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा काढला.

यावेळी धनंजय मुंडे बोलताना म्हणाले ,स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता, खासदारकी आणि मंत्रीपद मिळूनही त्यांना स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांच्या वारसदारांनीच त्यांचे नाव पुसण्याचे काम केले असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तसेच नागापूरचे पाणी वाण धरणात यावे, हे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या वारसदारांना सत्ता असूनही साधे एक स्वप्न पूर्ण करता आले नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बारामतीच्या नेतृत्वावर खडे फोडण्यापेक्षा स्वतःचे अपयश त्यांनी मान्य करावे, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी मला जनसामान्यांसाठी संघर्ष करण्याचा वारसा दिला. मागील साडेचार वर्ष जनसामान्यांसाठी मी संघर्ष करीत आहे, या संघर्षातून मी मुंडे साहेबांचे नाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान परळी विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. स्वत: शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील दौऱ्यावेळी त्यांच्या नावाची घोषणा केली.याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी शरद पवार स्वतः जरी बीडमध्ये उभे राहीले तरीही येथे कमळच फुलेल असा टोला पंकजा मुंडे यांनी पवारांना लावला होता.

महत्वाच्या बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top