Saturday, 19 Sep, 6.07 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मराठा आंदोलन रोखण्यासाठीच मुंबईमध्ये जमावबंदी ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. यानंतर राज्यभरात आंदोलनं सुरु झाले आहेत. तर भाजप नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक देखील आक्रमक झाले आहेत.

मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने कालपासून अचानक जमावबंदी लावली आहे. असं असलं तरी इतर व्यवहार व इतर गोष्टी सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाचे कारण देत हि जमावबंदी जागू करण्यात आली आहे की मराठा समाजाची आक्रमकता बघता मुंबईत संभाव्य आंदोलन टाळण्यास करण्यात आलेली युक्ती? असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जमावबंदीवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘ मराठा आरक्षणाचा आवाज व आंदोलन दाबण्यासाठी मुंबईत ही जमावबंदी लावण्यात आली आहे’ असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी करण्यात आली आहे कि कोरोना रोखण्यासाठी? यावर आता स्पष्टीकरण मागितले जात आहे.

:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top